IMG-20181117-WA0018

संकल्प मित्र फाउंडेशन ही संकल्पनाच मुळात माळी समाजातील मंत्रालय आस्थापनात कार्यरत असणाऱ्या उच्च स्तरीय अधिकारी वर्गाची परस्परांची ओळख व्हावी, आणि त्यातून परस्परांना सहकार्य , मार्गदर्शन,प्रोत्साहन मिळावे हा खरा हेतू आहे . केवळ एकमेकांची ओळख व्हावी असा संकुचित हेतू न ठेवता समाजाच्या सर्वांगीण विकासामध्ये सक्रिय सहभागाची प्रेरणा मिळावी हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेऊन संकल्प मित्र फाउंडेशनची निर्मिती झाली.

मंत्रालयामधील वरिष्ठ पदांवर कार्यरत असणाऱ्या माळी समाजातील अधिकाऱ्यांची परस्पर ओळख झाल्यामुळे परस्परांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ होत आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील जाती बांधवांमध्ये आपुलकी वृद्धिंगत झाल्याने अस्मितेची अनुभूती जाणवू लागली आहे. सामाजिक उत्तरदायित्व या जाणिवेतून संकल्प मित्र फाउंडेशन ची कल्पना डॉ . राजू जाधव यांनी मांडली. या विधायक विचारातून संकल्प मित्र फाउंडेशन या क्लबची स्थापना झाली . यासाठी डॉ. राजू जाधव यांनी आपल्या सहकार्यासोबत सातत्याने संपर्क प्रस्थापित करून संकल्प मित्र फाउंडेशन ला दिशा व गती प्राप्त करून दिली. गेली ४-५ वर्षे या संकल्प मित्र फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना जोडण्याचे काम केले आहे.

वास्तविक हि एक सुरुवात आहे. आपल्या आपणां सर्वांच्या परस्पर सहकार्यातून माणुसकीचे नाते दृढ होईल व माळी समाज्याच्या सर्वांगीण विकासासाठी संकल्प मित्र फाऊंडेशन हा दीपस्तंभासारखे कार्य करेल असा आम्हाला विश्वास आहे.

MAH_7891
logo-01 blue

अध्यक्ष

डॉ .राजू य. जाधव (B.A.M.S., C.C.H., C.G.O., DIMS)

सचिव

अमोल खेडकर

संकल्प टीम

श्री. अजय गवळी

श्री. मच्छिंद्र गुलदगड

श्री. अश्विन गिरमे

श्री. प्रदिप राऊत

श्री. संजय धारमळकर

ॲड. सुनिल नेवसे

श्री. राहुल जाधव

श्री. रोहन बनकर

श्री. सतीश पुंड

श्री.मारोती वरोरकर