प्रत्येकाची स्वप्ने ,आशा ,आकांक्षा ,इच्छा अपेक्षा या भिन्न भिन्न असल्या तरी त्या जीवनाचा अविभाज्य घटक असतात. माणसांच्या जीवनात ध्येय ठरवून ते साध्य करणे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते . याचाच अर्थ निश्चित केलेली ध्येय साध्य करण्यासाठी केलेल्या धडपडीचे दुसरे नाव म्हणजे जीवन ! प्रसंग व काळानुरूप ध्येये व उद्दिष्ट्ये बदलत जातात. एक स्वप्न किंवा ध्येय साध्य झाले कि दुसऱ्या स्वप्नाचा पाठलाग करणे स्वाभाविक आहे .

DSC_0116

छोटी स्वप्ने, छोटी ध्येये साध्य झाली की मोठ्या स्वप्नांच्या व ध्येयांच्या मागे लागणे हाच जीवन प्रवास होय . संकल्प हा  देखील पूर्वनियोजित व ठरवून ठेवलेले उद्दिष्ट होय . संकल्प मित्र फाउंडेशनची निर्मिती हा देखील योगायोग म्हणावा लागेल. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी वर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला आहे.

माळी समाजातील अनेक दिग्गज मंडळी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर व शिखरावर विराजमान आहेत .विशेषतः राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,सहकार,कृषी,औद्योगिक,क्रीडा, आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेकांनी आपापले स्थान उंचावले असून आपल्या कार्यशैलीमुळे आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे .