संकल्प मित्र फाउंडेशनची खालीलप्रमाणे कार्यशाळा व चर्चासत्रे संपन्न झाली आहेत.
दि. : १६/११/२०१६- नागपूर अधिवेशन
दि. : ९/९/२०१७-नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब वाशी
दि . ९/१२/२०१८ रोजी चौथी कार्यशाळा नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब वाशी याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे
दि. : १६/१२/२०१९- नागपूर अधिवेशन
दि. : 9/20/2020- नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब वाशी.
वरील कार्यक्रमांचे महाराष्ट्र शासनाचे सेवा निवृत्त मुख्य सचिव (चीफ सेक्रेटरी) श्री. गोरडे साहेब , श्री . गो. रा. खैरनार , माजी जिल्हाधिकारी श्री . चंद्रकांतजी दळवी ,श्री. महेश झगडे, श्री. दादासाहेब झगडे , कार्यरत जिल्हाधिकारी श्री.शेखर गायकवाड , श्री.कैलास शिंदे, श्री.सुखदेव बनकर,प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ इ . मान्यवरांचे प्रबोधन आयोजित केले. माळी समाजातील विचारवंत ,शासकीय अधिकारी यांचे विचारमंथन देखील अनेक युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत .
संकल्प मित्र फाउंडेशनचे कार्य अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी डॉ . राजू जाधव सातत्याने प्रयत्नशील असून या क्लबचे रोपटे वाढीस लागलेले आहे .यामुळे मंत्रालयातील अधिकारी वर्गामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे .
समाजातील तळागाळातील सर्वसामान्य माणसांना कायदे व नियमांच्या चौकटीत राहून अचूक व योग्य वेळी मार्गदर्शनामुळे अनेक यक्षप्रश्न सहजासहजी सुटत आहेत. याचा परिणाम म्हणजे जाती बांधवांमध्ये स्नेहाचे वातावरण तयार झाले आहे. सहज सुचलेली कल्पना प्रत्यक्षात साकार झालेली पाहताना पदाधिकारी सुद्धा नव्या जोमाने व उमेदीने कार्यरत झाले आहेत .
संकल्प-सिद्धी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन विधायक कामे जलदगतीने पार पाडण्यासाठी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून समाज बांधवांना भक्कम आधार हे तत्त्व वस्तुस्थितीत येण्यासाठी प्रबोधन व सातत्यपूर्ण मागोवा घेतला जात आहे . वास्तविक ही एक छोटी सुरुवात आहे पण उद्याच्या भविष्यकाळात दीपस्तंभ म्हणून याकडे नक्कीच पाहिले जाईल असा आशावाद संकल्प मित्र फाउंडेशनचा आहे हे सांगताना अतिशय आनंद होत आहे .